टॅबमध्ये माझ्या मैत्रिणींसोबतचे XXX खासगी फोटो…; रवींद्र एरंडेची पोलिसांसमोर धक्कादायक कबुली

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचं प्रकरण राज्यभर गाजत असताना नाशिकमधील दुसरा भोंदू रवींद्र एरंडे प्रकरणात देखील नवनवीन खुलासे होत आहेत. हस्तरेषातज्ज्ञ असल्याचे भासवून भोंदूगिरी करणाऱ्या संशयित रवींद्र एरंडे याने त्याच्या ‘टॅब’मध्ये शेकडो आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ आढळले आहेत

हे सर्व आक्षेपार्ह सामग्री दुसरी तिसरी कुणाची नव्हे तर एरंडे याच्याच मैत्रिणींची असल्याचं समोर आलं आहे. आता या व्हिडीओजबाबत रवींद्र एरंडे याने धक्कादायक कबुली दिली आहे.

‘टॅबमध्ये माझ्या मैत्रिणींसोबतचे विवस्त्र खासगी फोटो आणि व्हिडीओ आहेत’, असं एरंडेनं पोलिसांना सांगितलं आहे. त्याने खंडणीबाबत दाखल केलेल्या फिर्यादीत देखील याचा उल्लेख केला आहे. पण एरंडेच्या जवाबामुळे आता या प्रकरणाला नवं वळण मिळताना दिसत आहे. आरोपी एरंडे हा संबंधित अश्लील फोटो आणि व्हिडीओचा वापर करून महिलांचं लैंगिक शोषण करत होता का? किंवा खंडणीसाठी त्यांना ब्लॅकमेल करत होता का? याचा तपास पोलीस करत आहेत.