
पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोकं वर काढल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे. शहरातील गंगानगर परिसरात एका तडीपार गुंडाची अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली आहे.

कुख्यात गुंड राणा कांबळे याच्यावर कोयत्याने सपासप वार करत त्याचा खून करण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. राणा कांबळे हा गेल्या काही महिन्यांपासून तडीपार होता. मात्र, तडीपार असतानाही तो गंगानगर परिसरात मुक्तपणे वावरत असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे पोलिसांच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

राणा कांबळे याच्याविरोधात चोरी, मारामारीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. दरम्यान, वर्चस्वाच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासातून समोर येत आहे. ओम मोरे आणि त्याच्या साथीदारांनी हा खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
काही संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. तडीपार गुंड शहरात मुक्तपणे कसे वावरत होते, हा मोठा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात कुख्यात तडीपार गुंडाचा कोयत्याने वार करत खून करण्यात आला. गंगानगर परिसरात तडीपार गुंडाचा कोयत्याने हल्ला करत खून केला. राणा कांबळे या कुख्यात गुंडाचा खून झाला. राणा कांबळे गेल्या अनेक महिन्यापासून तडीपार होता असं असताना सुद्धा पुण्यातील गंगा नगर परिसरात राणाची दहशत होती. कांबळे याच्याविरुद्धच्या गुन्ह्यासह चोरी आणि मारामारीची गुन्हे आहेत. वर्चस्व वादातून ओम मोरे आणि त्याच्या साथीदारांनी राणा कांबळेला कोयत्याने सपासप वार करत हत्या केली
पुण्यातील गंगानगरमध्ये ओम मोरे आणि राणा कांबळे याच्यात वाद झाला होता. या वादानंतर ओम मोरे आणि त्याच्या साथीदाराने राणा कांबळेला रस्त्यात गाठलं. ओम मोरे आणि त्याच्या साथादाराजवळ कोयते होते. त्यांच्यात सुरुवातीला बाचाबाची झाली. त्यानंतर ओम मोरे आणि त्याच्या साथीदाराने राणा कांबळेवर हल्ला केला. तिघांनी केलेल्या राणावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात राणा रस्त्यावरच कोसळला. तिघांच्या जीवघेणा हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्यावरील हल्ल्याचा सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागला.










