निदा खान फरार, पण पती अडकला!

नाशिकच्या आयटी हबमध्ये सध्या टीसीएस कंपनीतलं प्रकरण जोरात गाजत असून सगळीकडे याच केसची चर्चा आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण करून त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणल्याचा आरोप असून याप्रकरणात आत्तापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे.

मात्र या केसमधील प्रमुख सूत्रधार, एचआर निदा खान ही अद्याप फरार असून पोलिसांना सातत्याने गुंगारा देत आहे. तिने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केल्याची माहितीदेखील समोर आली आहे. दरम्यान याच प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. फरार निदा खान हिचा पती मोईन खान याला पोलिसांनी मुंब्रा येथून ताब्यात घेतलं आहे. निदा मात्र सातत्याने लोकेशन बदलत असून पोलिसांना गुंगारा देत आहे. याप्रकरणी ATS कडून देखील आणखी दोन जण ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान निदा खान हिच्या शोधासाठी SIT ची 3 पथकं मागावर आहेत. ती मुंब्रा येथे लपली असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे रेकी करत छापा टाकला होता, मात्र ती आधीच तेथून फरार झाली होती. मात्र पोलिसांनी तिचा पती, मोईन खान याला ताब्यात घेतलं. मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याची चौकशी केली. निदाबद्दलही विचारणा करण्यात आली होती, तेव्हा निदा खान नातेवाईकांकडे गेल्याची माहिती तिच्या पतीने दिली. मात्र त्आ नातेवाईकांचे घर आणि फोन बंद असल्याने, अद्यापही निदाचा शोध लागलेला नाही. दुसरीकडे निदाने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. वकिलांच्या माध्यमातून अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी ती प्रयत्न करत असतानाच पोलीस तिच्या मागावर आहेत.तिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज नाशिक कोर्टात सुनावणीची शक्यता आहे.