
राज्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी आता मुंबईतील कफ परेड पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला असून, ट्रान्सजेंडरच्या तक्रारीवर कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रान्सजेंडरच्या भावविरोधातच कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अन्न व औषध प्रशासनात मध्ये नोकरी लावण्याची मागणी केल्याचा अन्यथा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा एफआयआरमध्ये आरोप केला आहे. विशेष म्हणजे, हा व्हिडिओ मूळ स्वरूपात नसून तो ‘एडिट’ करून किंवा त्यात छेडछाड करून व्हायरल करण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे. कफ परेड पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७९ आणि ३५१(१) सह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कलमांनुसार, कोणाच्या तरी गोपनीयतेचा भंग करणे, बदनामीकारक मजकूर पसरवणे आणि धमकावणे यांसारख्या गुन्ह्यांचा समावेश होतो. या प्रकरणाचा तपास आता कफ परेड पोलिसांकडून केला जात आहे.











