नांदेड हादरलं! ७० तास, ५ खून; खाकीचा धाक संपलाय का ?

आज महाराष्ट्राचं ‘नांदेड’ शहर रक्ताने माखलंय. गेल्या ७० तासांत तब्बल ५ हत्या! होय, तुम्ही बरोबर ऐकलंत. अवघ्या तीन दिवसांत पाच जणांचा बळी गेलाय. नांदेडमध्ये कायद्याचं राज्य आहे की गुंडांचं? हा प्रश्न आता प्रत्येक नांदेडकराच्या मनात आहे.

सोनू कल्याणकर असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. सोनू हा एका पुरस्कारप्राप्त शिक्षिकेचा मुलगा असून, जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. त्याची हत्या आज पहाटे श्रीनगर परिसरातील बीके हॉलकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोनू कल्याणकर या तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली.

या हत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला असून तपासाची चक्रे फिरवली आहे. आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.ही हत्या जुन्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे. भाग्यनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना झालेली आहे. तीन दिवसांमध्ये हा पाचवा खून आहे.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या तिहेरी हत्याकांडानंतर काल एका तरुणाचा आणि आज पहाटे पाचवा हत्या झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या घटनांमुळे नागरिक भयभीत झाले आहे. या वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यासाठी नागरिकांनी आक्रमक मागणी केली असून शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.