
आयटीने भोंदू अशोक यातील दोन मोबाइलमधील डेटा रिकव्हर खरातचे तीन मोबाइल जप्त केले असून, करण्यात आला आहे. एका मोबाइलमध्ये राज्यातील बड्या राजकीय व्यक्तींचे खरातला कॉल आल्याचे उघड झाल्यावर जप्त केलेल्या दुसऱ्या मोबाइलमधूनही खरातचे अनेक कांड बाहेर आले आहेत.

यातील एका मोबाइलमध्ये खरातच्या सीएकडे १० तासांच्या थाटात झालेल्या पूजेचे काही व्हिडीओ एसआयटीने तपासले असून, यात भारत अन् दुबईत सराफा व्यवसायात बस्तान बसविलेल्या एका व्यावसायिकाचा सहभाग असल्याचे दिसून आले आहे.

हाच सराफ व्यावसायिक सोन्याची हॉलमार्क करणाऱ्या कंपनीचा मालक आहे. त्याच्याच मार्फत खरात हवाला रॅकेट चालवित असल्याचा संशय आहे. काळे पैसे पांढरे करण्याचा धंदा या सराफ व्यापाऱ्यासह अन्य व्यापाऱ्यांच्या माध्यमातून खरात करीत असण्याची शक्यता आहे.
सीएच्या पुण्यातील निवासस्थानी ही पूजा खरातच्या देखरेखीखाली झाली होती. पूजेसाठी त्याचे अनेक भक्त उपस्थित होते. खरात भक्तांना पूजा करायला लावत असे. यातून भक्तांच्या मनात भीती घालून लाखो रुपयांची अंगठी, खडे घेण्यास भाग पाडत असे. खरातकडे सापडलेल्या चारही मोबाइलमधील डेटा रिकव्हर झाल्यानंतर खरातसोबत अनेक अनोळखी लोक दिसत असून, त्यातील काही जण जमीन, सावकारी व्यवसायाशी निगडित आहेत. या चारही मोबाइलचा वापर खरात आर्थिक घोटाळे करण्यासाठीच करीत असल्याचा संशय आहे.










