
राज्यात सध्या भोंदू बाबा अशोक खरातप्रकरणावरुन राजकीय आरोप प्रत्यारोपही पाहायला मिळत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अशोक खरातचे सीडीआर समोर आणले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेतही त्यांचा अनेक कॉल झाल्याची माहिती दमानिया यांनी दिली.

त्यासंदर्भाने शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना, अंजली दमानिया यांच्यावरच सवाल उपस्थित केला आहे. अंजली दमानिया काय रॉ एजंट आहेत का? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. तसेच, सरकारच्या निशाण्यावर स्वकीयच आहेत, असे म्हणत नाव न घेता एकनाथ शिंदेंनाही लक्ष्य केलं.

अशोक खरात प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही सीडीआर समोर आणले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह रुपाली चाकणकर आणि काही नेत्यांच्या खरातसोबत झालेल्या संवादाचे डिटेल्स त्यांनी दिले आहेत. त्यावर, संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली. अंजली दमानिया काय रॉ एजंट आहेत का? मुख्यमंत्री कार्यालयशिवाय एवढी गुप्त माहिती बाहेर येऊ शकत नाही. त्यामुळे फडणवीस यांच्या टार्गेटवर कोणीतरी आहेत का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. बाह्य शक्तीकडून जेंव्हा धक्कादायक माहिती बाहेर काढली जाते, तेंव्हा स्वकीय सरकारच्या निशाण्यावर आहे, असेही राऊत यांनी म्हटले.










