कोथरूड, डेक्कनसह ‘या’ ११ पोलीस ठाण्यांचे प्रभारी बदलले; शहर पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय

पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याबरोबरच प्रशासकीय कारणास्तव पुणे शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत एक मोठी घडामोड समोर आली आहे. शहर पोलीस दलातील ११ पोलीस निरीक्षकांच्या (Police Inspectors) तात्पुरत्या स्वरूपात अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंगळवारी (दि. २) याबाबतचे अधिकृत आदेश जारी केले आहेत.

पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीत निर्णय

महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम २२ मधील तरतुदींनुसार, पुणे शहर पोलीस आस्थापना मंडळाची मंगळवारी बैठक पार पडली. या बैठकीतील मान्यतेनेच या बदल्यांचे आदेश देण्यात आले आहेत. बदली झालेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या नवीन तात्पुरत्या पदस्थापनेच्या ठिकाणी तत्काळ हजर होऊन कार्यभार स्वीकारण्याचे आणि त्याचा अनुपालन अहवाल पोलीस आयुक्त कार्यालयाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

संदीप नारायण देशमाने (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोथरूड पोलिस स्टेशन- फरासखाना पोलिस स्टेशन), रुणाल सुजाउद्दीन मुल्ला (पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा- वरिष्ठ पोलिस निरीक्षक डेक्कन पोलिस स्टेशन), मानसिंग संभाजी पाटील (काळेपडळ पोलिस स्टेशन- वरिष्ठ पोलिस निरीक्षक भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन), अरुण दत्तू घोडके (विश्रामबाग पोलिस स्टेशन (गुन्हे) वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोथरूड पोलिस स्टेशन), राजेंद्र भाऊराव पन्हाळे (लोणीकाळभोर पोलिस स्टेशन- वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विश्रांतवाडी पोलिस स्टेशन), संतोष एकनाथ खेतमाळस (लष्कर पोलिस स्टेशन- वरिष्ठ पोलिस निरीक्षक- कोंढवा पोलिस स्टेशन), पंडित हणमंतराव रेजितवाड (पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वानवडी पोलिस स्टेशन), युवराज संभाजी हांडे (गुन्हे शाखा- वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लष्कर पोलिस स्टेशन), गिरीषा अभ्युदय निंबाळकर (वरिष्ठ पोलिस निरीक्षक-डेक्कन पोलिस स्टेशन- काळेपडळ पोलिस स्टेशन)

तात्काळ पदभार स्वीकारण्याचे आदेश

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या आदेशानुसार, या सर्व ११ अधिकाऱ्यांना तातडीने आपापल्या नवीन पोलीस ठाण्याचा किंवा विभागाचा पदभार स्वीकारण्यास सांगण्यात आले आहे. आगामी काळातील कायदा व सुव्यवस्थेचे आव्हान पाहता या अंतर्गत बदल्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.