
सोलापूर-हैद्राबाद महामार्गावर असलेल्या बोरामणी गावात कौटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा खुन केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत महिलेच्या पतीचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून मृत महिला व दिराचे शेतीच्या वादातून सतत भांडण होत होते. मागील काही दिवसांपासून शेतीचा वाद विकोपाला गेला होता, त्यामुळे मारहाण व शिवीगाळीसारखे प्रकार सातत्याने होत होते.
शनिवारी पहाटेच्या सुमारास दिराने रागाच्या भरात भावजय व दोन पुतण्यांचा खून केला. या घटनेची माहिती मिळताच सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे हे घटनास्थळी दाखल झाले असून बघ्यांची मोठी गर्दी जमली आहे.










