
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यातील आपल्या ‘मोदी बाग’ या निवासस्थानी संपूर्ण पवार कुटुंबाची तातडीची बैठक बोलावली आहे. गेल्या काही काळातील राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कुटुंब एकाच छताखाली येणार असल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

बैठकीला कोण-कोण उपस्थित राहणार?

या बैठकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात पवारांच्या तिन्ही पिढ्या एकत्र दिसणार आहेत. बैठकीला खालील सदस्य उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. शरद पवार, प्रतापराव पवार, श्रीनिवास पवार, राजेंद्र पवार,खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, सदानंद सुळे, शर्मिला पवार, आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार, पार्थ पवार, जय पवार, अभिजीत पवार असे सर्व कुटुंब या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
बैठकीचे नेमके कारण काय? ‘लॅंच’ की ‘लॉजिक’?
या बैठकीचे अधिकृत कारण खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या लग्नाची चर्चा आणि कौटुंबिक स्नेहभोजन असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, राजकीय विश्लेषकांच्या मते या बैठकीमागे काही गंभीर कारणे असू शकतात.










