देवधर्माच्या नावाने भामटेगिरी! पुजाऱ्याने सराफासोबत मिळून भाविकांना लुटले

नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणाच्यातपासातदररोजकाही धक्कादायक बाबी समोर येत आहेत. अशातचआता अशोक खरात विरोधात पुरावे संकलित करण्याच्या कामाने वेग घेतला आहे. अशोक खरातच्या तपासात तब्बल 160 GB डिजिटल पुरावे तपास यंत्रणांनी गोळा केल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे भोंदु खरातच्या मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिरातील पुजाऱ्याची पुन्हा एकदा SIT कडून चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे.

अशोक खरात पूजाविधी सांगून भक्तांना काही खडे, रत्न आणि बनावट अंगठी देऊन फसवणूक करत होता. अशोक खरातच्या संबंधित असलेल्या एका सराफ व्यावसायिकाची देखील एसआयटीने चौकशी केल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिरातील पूजाविधी करून भक्तांची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी SIT कडून तपास सुरू आहे. मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिरातील पुजारी आणि सराफ व्यवसायिकाची खरात समक्ष चौकशी करून घेतले असून SIT ने जाब विचारत जबाब नोंदवला आहे. पूजा विधीच्या नावाने आणि इतर देवतांची आराधना करत सुरू असलेले आर्थिक व्यवहार कशाच्या आधारे सुरू होता, याची पुजाऱ्याकडून चौकशी SIT कडून सुरू आहे. तर देवाचा अवतार असल्याचं सांगत भक्तांना वेगवेगळ्या प्रकारे फसवत आर्थिक फायदा केल्याचे पुरावे या चौकशी मधून समोर आले आहे.

अशोक खरातच्या जागी जर एखादा मुसलमान असता तर सर्व मुसलमानांची वरात काढली असती. मात्र जात-धर्म न पाहता नालायक व्यक्तीला नालायक म्हणण्याची हिंमत समाजामध्ये निर्माण झाली पाहिजे, असं मत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे.