देहूरोडमध्ये भाजप कार्यकर्त्याची दिवसाढवळ्या हत्या

देहूरोड गोळीबार प्रकरणात मोठीअपडेट समोरआलीअसूनयाप्रकरणी देहूरोड पोलिसांनी दोन संशयितांनाताब्यातघेतलंआहे. काल (29 एप्रिल) रात्रीच्या सुमारास देहूरोडमध्ये झालेल्या गोळीबारात रमेश रेड्डीची गोळ्या झाडून हत्या झाली होती.

या प्रकरणात पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान करत दोन संशयित पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. यातील एक संशयित मावळ तालुक्यातील गहुंजे मधील साई नगरमधून ताब्यात घेण्यात आला आहे. तर दुसरा संशयित देहूरोड मधील थॉमस कॉलनी इथून पहाटेच्या दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. सध्यापोलीस या प्रकरणाचा तपास करत असून यातील मारेकरी शोधून काढणं आता पोलिसां पुढचं आव्हान असणारआहे.

देहूरोडमध्ये गोळीबारची थरारक घटना घडली होती. यात भाजपचे सक्रिय कार्यकर्त्य असलेलं रमेश रेड्डी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला असून यात एकामागोमाग एक राऊंड फायर केलेहोते. यातील एक गोळी रमेश रेड्डी यांच्या मस्तकाला भेदून गेल्याने त्याना जखमी अवस्थेत देहूरोडच्या आधार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं असता, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केलं.

दरम्यान, याघटनेनं परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता, तर रमेश रेड्डीचे नातेवाईक मित्र परिवाराने हॉस्पिटलमध्ये आक्रोश करत जुना पुणे-मुंबई महामार्ग जाम करण्याचा प्रयत्न केला, पण देहूरोड पोलिसांच्या हस्तक्षेपनंतर रमेश रेड्डीचा मृतदेह पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात हलविण्यात आला. तर रमेश रेड्डीवर हल्ला झाल्याचं कारण पोलीस तपासात समोर येईल तर या गोळीबाराच्या घटनेमुळे देहूरोड बाजारातील दुकाने व्यापारी वर्गाने त्वरित बंद केली होती. या घटनेनंतर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अशातच आता पोलिसांनी तपासाची चक्र गतिमान करत दोन संशयितांना अटक केली आहे.