भोंदूबाबाचं कनेक्शन आता पंचतारांकित हॉटेलपर्यंत!

नाशिक भोंदूबाबा अशोक खरातप्रकरणात अत्यंत महत्त्वाची घडामोड मंगळवारी घडली. एसआयटीकडून शहरातील एका मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची प्रदीर्घ चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. संबंधित व्यावसायिक आणि खरात यांच्यातील जमीन व्यवहार तसेच अन्य वार्वीचीही विचारपूस यावेळी करण्यात आली.

शहरात मध्यंतरी वादग्रस्त ठरलेल्या आणि ‘गोल्डन गँग’ म्हणून चर्चेत असणाऱ्या कंपूमध्ये या हॉटेल व्यावसायिकाचा बोलबाला होता. अगोदरपासून संशयाच्या भोवऱ्यात असणाऱ्या या व्यावसायिकाची खरात प्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण केंद्राच्या कार्यालयात मंगळवारी दुपारी तीन ते नऊ अशी तब्बल सहा तास चौकशी आल्याचे सांगण्यात करण्यात येते. चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आल्याची माहिती आहे.

खरात याची राजकीय, सामाजिक क्षेत्रासह अनेक व्यवसायिकांशी जवळीक आहे. या व्यावसायिकांसोबत खरातने आर्थिक व्यवहार केल्याचा दाट संशय एसआयटीला आहे. खरातप्रकरणात संबंधित हॉटेल व्यावसायिक जमिनीच्या काही व्यवहारांमध्ये मध्यस्थीची भूमिका बजावत होता, असे देखील कळ खरात आणि संबंधित हॉटेल व्यवसायिकात किती कॉल झाले. कोणत्या विषयावर बोलणे झाले माहिती चौकशीत गोळा करण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार पाथर्डी तरं मखमलाबाद येथील मोठ्या जमीन व्यवहाराशी संबंधित बाबींची चौकशी झाल्याचे कळते. चौकशीसाठी त्यांची गरज पडल्यास पुन्हा बोलवले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मध्यंतरी याच हॉटेल व्यावसायिका संबंधित प्रकरण बरेच गाजले होतं. त्यामुळे त्याच प्रकरणात त्याची चौकशी झाली का? अशी चर्चा होती. पण खरातसोबत आर्थिक संबंधावरून चौकशी झाल्याची माहिती मिळते.