
महिलांचे लैंगिक शोषण आणि फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला नाशिक भोंदूबाबा अशोक खरातच्या पोलीस कोठडीत १ एप्रिल पर्यंत वाढ करण्यात आली आहे. रविवारी सुनावणीदरम्यान विशेष तपास पथकाने SITने खरात प्रकरणात केलेल्या तपासाची धक्कादायक माहिती सादर केली.

अशोक खरात महिलांवर अत्याचार करण्यापूर्वी त्याच्याकडील पेढे आणि द्रवपदार्थांचा वापर करत होता. ते पेढे खाऊन आणि द्रप पदार्थ प्यायल्यानंतर तो महिलांना गुंगी येत असे, त्यानंतर तो महिलांचे लैंगिक शोषण करत होता असा धक्कादायक खुसाला SITने न्यायालयात केला.

सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, खरात तपासात अजिबात सहकार्य करत नाही. अशोक खरात महिलांना विवस्त्र करून किंवा त्यांच्यावर अत्याचार करण्यापूर्वी विशिष्ट पेढे आणि एका गूढ द्रव पदार्थाचा वापर करत असे. त्या पेढ्यामध्ये कोणते घटक मिसळले जात होते आणि या गुन्ह्यात त्याला कोणाची मदत मिळत होती. याबाबत त्याने अद्याप मौन बाळगले आहे. या गूढ द्रव पदार्थाचा शोध घेणे आणि रासायनिक चाचणी करणे तपासासाठी अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे त्याची कोठडी वाढवून मिळावी, अशी विनंती पोलिसांनी केली होती.










