
अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात कौटुंबिक वादाने हिंसेचं टोक गाठलं असून मुलानेच आपल्या जन्मदात्या पित्याचा खून केल्याची घटना घडली आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर परिसरात हि धक्कादायक घटना घडली आहे. 1 मे च्या रात्री साडे आकारा वाजेच्या दरम्यान हि घटना घडल्याची माहिती आहे . यात कौटूंबिक वादातून मुलाने वडीलांवर चाकूने वार करत हि हत्या केली आहे.

चाकूच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने पित्याचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे.मुसा हसन बागवान असं 65 वर्षीय मयत इसमा चे नाव असून या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, आरोपी मुलगा आशपाक बागवान यास पोलीसांनी तात्काळ ताब्यात घेतलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीसांसह फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी दाखल होऊन पुढील कारवाई सुरु केली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. मात्र किरकोळ कारणातून जन्मदात्या वडिलांची हत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.










