“मैत्री की काळ? वसईत मित्रानेच घेतला मित्राचा बळी ; पैशाच्या वादातून मित्राचाच शिरच्छेद

वसईत उघडकीस आलेल्या शिर नसलेल्या मृतदेहाच्या (प्रकरणाने केवळ गुन्हेगारीच नव्हे, तर मानवी नात्यांमधील भीषणता समोर आणली आहे. ज्या मित्रावर विश्वास ठेवून मयत व्यक्तीने छोटंसं दुकान पार्टनरशिपमध्ये सुरू केलं, त्याच मित्राने पैशांच्या वादातून त्याचा निर्दयीपणे खून केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

सोमवारी सकाळी ९च्या दरम्यान मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाजवळच पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंब्याच्या वाडीत एका गोणीत शिर नसलेल्या इसमाचा गोणीत मृतदेह मिळाला होता. पोलिसांसमोर अनोळखी व्यक्तीचा नाव ओळखने मोठं जिकरीच होतं. हातावरील एका नावाच्या टॅटूवरुन ओळख झाली. घटनास्थळाचा पंचनामा आणि श्वान पथकाच्या मदतीनं रॅपीड आठ तासाच्या तपासात आरोपी मिळून सापडला आणि मयताच धड ही मिळालं.

खाणिवडे खाडीत त्याने धड टाकलं होतं. तपासात हत्येचं कारण निष्पण झालं ते हादरवणार आणि विचार करायला लावणार होतं. मयत अशोक सिंह राजपूत आणि आरोपी दिनेशकुमार प्रजापती या दोघांनी मिळून संसार उभा करण्यासाठी वसईच्या जाबरपाडा येथे किराणा मालाचा छोटा व्यवसाय सुरू केला होता. मात्र, हाच व्यवसाय वादाचे कारण ठरला. पैशांच्या देवाण घेवाणीवरून निर्माण झालेला तणाव इतका टोकाला गेला की,आरोपीने थेट मित्राचा जीव घेण्याचा निर्णय घेतला. एवढंच नव्हे, तर ओळख लपवण्यासाठी मृतदेहाचे शीर वेगळं करण्याइतकी अमानुष क्रूरता त्याने दाखवली आणि एका क्षणात विश्वास, मैत्री आणि माणुसकी यांचा अंत झाल्याचे चित्र या घटनेतून दिसून येते. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी दिनेशकुमार प्रजापती आणि त्याला साथ देणारा संदिप तिवारी या दोघांना अटक केली आहे. वसई न्यायालयाने दोघा आरोपीना १० एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.