
नागपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १४ वर्षीय अर्थव ननोरे हा हनुमान जयंतीच्या निम्मित गिट्टीखदान येथे निघालेल्या शोभायात्रेतून बेपत्ता झाला होता.

त्यानंतर त्याचा मृतदेह भरतवाडा पुलावर पोत्यात सापडला. अत्यंत निर्घृण अवस्थेत त्याचा मृतदेह सापडून आला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तीन दिवसानंतर उलगडा करण्यात यश आला आहे. आरोपी हे दुसरे तिसरे कोणी नसून अर्थवचे शेजारी आहे.

हनुमान जयंतीनिमित्त गिट्टीखदान येथे निघालेल्या शोभायात्रेतून अथर्व बेपत्ता झाला होता. त्यांनतर त्याचा मृतदेह भरतवाडा पुलावर पोत्यात बांधलेला आढळ्याला. यामुळे आसपासच्या परिसरात मोठी खळबळ उडाली होती. नागपूर पोलिसांनी तपासाचे चक्रे गतिमान केला आणि आरोपीला अटक केली. आरोपी हे अर्थवचे शेजारी आहे. जय यादव आणि त्याचे मित्र कृणाल शाहू आणि आशिष शाहू यांनीच अपहरण करून हत्या केली. आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे.
हनुमान जयंतीच्या रॅलीमधून गाडी आणायला जायचं आहे, असे कारण देत आरोपींनी अथर्वला सोबत घेऊन गेले. अपहरण केल्यानंतर काही तासात अर्थवची गळा आवळून हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपींनी अथर्वचा मृतदेह गाडीतच ठेवला होता. तर शनिवारी लोणार भागात अथर्वचा मृतदेह सापडला होता.
अर्थवची हत्या पैश्यांसाठी केल्याचे समोर आले आहे. त्याचा अपहरण करून खंडणी मागण्याचा आरोपींचा कट होता. मात्र हत्येनंतर भीतीमुळे खंडणीसाठी आरोपींनी दोन केला नसल्याने हत्येचा उलघडा होत नव्हता. अखेर तीन दिवसानंतर या हत्येचा उलगडा करण्यात नागपूर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पुढील कारवाई करत आहे.










