
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार पडताळणीच्या कामात हलगर्जीपणा केल्याने दोन मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांविरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र, त्यालाही प्रतिसाद न दिल्याने जिल्हा प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आगामी मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत सध्याच्या मतदारांची २००२ च्या मतदार यादीशी पडताळणी करण्यात येत आहे. तसेच, मतदारांच्या तपशीलातील (नाव, लिंग, वय, फोटो, पत्ता) आवश्यक दुरुस्त्या करण्याची कार्यवाही सुरू आहे.

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील यादी भाग क्र. २२८ चे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि यादी भाग क्र. २३० चे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे काम करीत नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यांना याबाबत वारंवार कारणे दाखवा नोटीसा देऊनही कामात सहभागी न झाल्याने उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.










