
नागपूर शहर पुन्हा एकदा एका हत्येच्या घटनेनं हादरलं आहे. शहरातील अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जादुमहाल परिसरात 200 रुपयाच्या जुन्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आलीय . सागर सलामे असं या तरुणाचे नाव आहे धक्कदायक बाब म्हणजे हत्येच्या आरोपात अटकेत असलेले सर्व अकरा आरोपी हे अल्पवयीन असल्याची माहिती नागपूर पोलिसांनी तपासत उघड केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम सुरु असताना आरोपी आणि सागर सलामे यांच्यात जुना वाद उफाळून आला. दरम्यान हाणामारीचे रूपांतरण रक्तरंजित राड्यात झाले आहे. या घटनेनं परिसरात मोठी दहशत पसरली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतआहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसाआधी आरोपींचा मृतकासोबत पैशावरून वाद झाला होता. मृतक अजनी हद्दीत फिरायला आल्याची माहिती आरोपींना मिळताच त्याचा पाठलाग करून आरोपीने धारधार शास्त्राने हल्ला करत सागर सलामेची हत्या केली. यावेळी मृतकाचा मित्र त्याच्या सोबत होता. त्यात तो देखील गंभीर जखमी झालाआहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणात पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारावर आरोपींना काही तासात अटक केली असून अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे अल्पवयीन असल्याची माहिती आहे.









