
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याला चौथ्या गुन्ह्याप्रकरणी अठरा एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर भोंदु अशोक खरातच्या SIT चौकशीत अद्याप मुद्द्यांवर तपास सुरू आहे . अशातच आता भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे.

महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरातनं अनेक व्यवसायिक तसेच गृहस्थांनाही गंडवलं होतं. अलीकडेच त्याचा नॅशनलाईज बँकेसंबंधी नवा कारनामा उघड झाला आहे. यामुळे अशोक खरातचा पाय आणखी खोलात गेल्याचं दिसून येतंय. परिणामी अशोक खरातचे आर्थिक व्यवहारातील भागीदार आता SIT च्या रडारवर आलेआहे.

दरम्यान, नाशिकसह अहिल्यानगर जिल्ह्यातील विकासक आणि बांधकाम व्यावसायिकांची SIT कडून आताचौकशी केली जाणार आहे. अशोक खरातच्या आर्थिक व्यवहारात मोठ-मोठे बांधकाम व्यावसायिक सहभागी असल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे. यात भोंदू खरात भक्तांकडून श्रद्धेच्या नावावर लाखो रुपये उकळवत असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली असून त्या दिशेने तपास सुरु आहे.
अशोक खरातची SIT पथकाकडून आर्थिक व्यवहार आणि मालमत्तेतीली भागीदारांची माहिती गोळा केली जात असल्याचीमाहितीआहे. अशातच अशोक खरातची चौथ्या गुन्ह्यात अठरा एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली असून तपासातून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भक्तांच्याश्रद्धेचागैरफायदाघेत भोंदू खरातने अनेक ठिकाणी जमीन खरेदी केल्याआहेत. यांपैकी काही एकर जमीन त्याने शिर्डी येथे देखील खरेदी केल्याचीमाहितीआहे. त्याची ही सगळी जमीन एकूण 11 ते 12 एकर असल्याचं समोर आलं होतं. अलीकडेच त्याने खरेदी केलेल्या 4 एकर जमीनीसाठी नॅशनलाईज बँक खात्याचा वापर करण्यात आला असल्याचा आरोप आहे. या नॅशनलाईज बँकेतील खाती कल्पना खरातच्या नवावर आहेत. संबंधित खात्यायंमधून 17 कोटींचे व्यवहार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.पोलीस यंत्रणा पुढील तपास करत असून बरीच माहिती उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.









