संसदेत महिला राज येणार; ३३ टक्के आरक्षणाचा ऐतिहासिक कायदा लागू

महिला आरक्षण आणि परिसीमनशी संबंधित तीन विधेयकांवर आज शुक्रवारी १७ एप्रिल लोकसभेत दुसऱ्या दिवशी चर्चा होईल. पहिल्या दिवशी १३ तास चर्चा झाली. दरम्यान, सरकारने गुरुवारी रात्री उशिरा महिलांना संसदेत ३३ टक्के आरक्षण देणारा महिला आरक्षण अधिनियम-२०२३ लागू केला. या संदर्भात केंद्रीय कायदा मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे.

अमित शहा शुक्रवारी चर्चेला उत्तर देतील. विधेयकांवर संध्याकाळी ४ वाजता मतदान होईल. दरम्यान, विरोधी पक्षाची संसद परिसरात बैठक होत आहे. यात खरगे, राहुल यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत. लोकसभा अध्यक्षांनी विधेयकांवर चर्चेसाठी १५ तासांचा वेळ निश्चित केला. गुरुवारी रात्री उशिरा एक वाजेपर्यंत चर्चा चालली. काँग्रेसकडून प्रियंका गांधी, गौरव गोगोई, वेणुगोपाल यांनी विधेयकाच्या विरोधात आपली मते मांडली. प्रियंका म्हणाल्या की, आसामप्रमाणे देशभरातील जागांची फेररचना केली जाईल.

पंतप्रधान यासंदर्भातील भाषणात म्हणाले की, परिसीमनामध्ये कोणत्याही राज्यासोबत भेदभाव केला जाणार नाही. ही मोदींची हमी आणि वचन आहे. विरोधक याचे श्रेय घेऊ शकतात.

तसेच लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह  यांनी दक्षिण भारतातील राज्यांच्या लोकसभा जागा कमी होणार असल्याच्या आरोपांना ठामपणे फेटाळले. तसेच जातीय जनगणना आणि परिसीमन या मुद्द्यांवरही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.