
सध्या देशभरात एलपीजी गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे लोकं चिंतेत आहेत. एकतर गॅस वेळेवर मिळत नाहीये. म्हणून लोकं चिंतेत आहे. पण तुटवडा वाढला तर एलपीजीच्या गॅसच्या किंमती वाढणार का?

अशी भीतीही लोकांमध्ये आहे. कारण गॅसच्या किंमती वाढल्या तर सर्वसामान्यांचं बजेट हलणार आहे. आधीच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. पण आता एलपीजी गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून एलपीजी आणि पीएनजी टॅक्स फ्री करण्याची मागणी केली आहे. संस्थेने तर्क लावलाय की, अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक स्तरावर गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झालाय. ज्यामुळे किंमती वाढल्या आहेत. टॅक्स हटवल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.

सर्व एलपीजी सिलेंडरवर 5% जीएसटी वसूल केला जातो. तर कमर्शियल सिलेंडरवर हे दर 18% आहे. तसंच पाइपच्या माध्यमातून येणारा घरगुती गॅस म्हणजेच पीएनजीवर सध्या जीएसटी लावला जात नाही. मात्र राज्य सरकार यावर 3% ते 14.5% पर्यंत व्हॅट वसूल करते. ज्यामुळे किंमती आणखी वाढतात.
सरकारने घरगुती गॅस सिलेंडरवर लावला जाणारा 5% जीएसटी कमी केला तर ग्राहकांची थेट बचत होईल. म्हणजेच 913 रुपयांचा घरगुती सिलेंडर जवळपास 43 रुपयांनी स्वस्त होईल. ज्यामुळे या गॅस सिलेंडरच्या नवीन किंमती 869.52 रुपये होतील. हे लहान कुटुंबाच्या मासिक बजेटला संतुलित ठेवण्यात खुप मदत करेल.
हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या 19 किलो कमर्शियल सिलेंडररवर 18% जीएसटी लावला जातो. सध्या या गॅस सिलेंडरच्या किंमती 2078.50 रुपये आहे. टॅक्स हटवल्यावर याच्या किंमती या तब्बल 317 रुपयांनी कमी होऊ शकतील. ज्यामुळे हे सिलेंडर तुम्ही फक्त 1761.44 रुपयांत खरेदी करू शकता. यामुळे खाद्य पदार्थांच्या किंमतीतही कमतरता येऊ शकते.










