
बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच चुलत चुलत्याने बळजबरीने अत्याचार केल्याचे समोर आले आहे.

अत्याचारास पीडितेने विष प्राशन करून आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्नज केला. तिच्यावर दोन दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना बीडच्या केज तालुक्यातील एका गावात घडली.

केज तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी ५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान गोठ्यातून घरी जात असतांना तिच्यावर चुलत चुलत्याने अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. घटनेनंतर मुलीने विष घेत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.
प्रकृती बिघडल्याने पीडितेला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मुलीचा मृत्यू झाल्याचे पोलिस उपचार सुरू असतांना शुक्रवारी उपनिरीक्षक उमेश निकम यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी चुलत चुलत्याला अटक केली आहे, पोलिस आधिक तपास करत आहेत.










