
सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव, फॅन फेवरेटचा स्टारचा मिळाला सन्मान

दुबई – बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने हिंदीसह साऊथ सिनेमांमध्ये काम केले आहे. तिच्या सौंदर्याचे जगभरात लाखो चाहते आहेत. नुकतंच दुबईत उर्वशीला Fans Favourite Star Actress Award ने सम्मानित करण्यात आले.

उर्वशी रौतेला चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावर जास्त सक्रिय असते. ती तिचे लूक आणि फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. उर्वशी रौतेला दुबईत “FANS FAVOURITE STAR ACTRESS AWARD” हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. यासंबंधित एक खास पोस्ट उर्वशीने सोशल मीडियावर केली आहे. उर्वशी रौतेलाने पुरस्कार घेताना खूपच सुंदर शिमरी ग्रीन कलरचा गाउन परिधान केला होता. “Fans Favourite Star Actress Award मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे. हा पुरस्कार तुम्हा सर्वांचा आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात.बरेच लोक मला विचारतात की, मी कधीही कोणाविरुद्ध का बोलत नाही कारण माझ्याकडे मधील तुमच्यासारखे स्ट्राँग, प्रेमळ, निष्ठावंत, प्रामाणिक चाहते आहेत. तुमचा पाठिंबा, आणि तुमचे प्रेम नेहमीच माझ्यासोबत असते.हा पुरस्कार आपल्या नात्याचा पुरावा आहे. मला तुमची आवडती स्टार बनवल्याबद्दल धन्यवाद!” अशी पोस्ट उर्वशीने केली आहे. उर्वशी रौतेलाने शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहेत. तसेच कलाकार देखील तिला शुभेच्छा देत अभिनंदन करत आहेत.

उर्वशी रौतेलाचे इन्स्टाग्रामवर 70.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. अभिनेत्रीचा जगभरात मोठा चाहता वर्ग आहे. उर्वशी रौतेला अलिकडेच ‘डाकू महाराज’ या सिनेमात दिसली होती. यातलं तिचं ‘डिबीडी डिबीडी’ आयटम साँग गाजलं. तर गेल्यावर्षी तिचा JNU सिनेमा आला होता. तसंच यंदाही तिने कान्समध्ये आपली जादू दाखवली होती.









