देशातील ‘या’ राज्यातील महिला पितात सर्वाधिक दारु

केंद्र सरकारच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर, महाराष्ट्राचा क्रमांक कितवा?

दिल्ली – दारुच्या विक्रीतून राज्याला मोठा महसूल मिळत असतो. पण त्यातून अनेक कुटुंब उघड्यावर देखिल पडत असतात. त्यामुळे देशातील काही राज्यात दारूबंदी आहे. पण आता पुरूषांबरोबर महिलाही दारु पिण्यात आघाडीवर असल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर कोणत्या राज्यात जास्त दारु पिली जाते याचा सर्व्हे समोर आला आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या सर्वेक्षण अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे. संपूर्ण देशात आसाममध्ये मद्यपान करणाऱ्या महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. आसाममध्ये १६.५ टक्के महिला दारू पितात. मेघालय दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे ८.७ टक्के महिला दारू पितात. अरुणाचल प्रदेश तिसऱ्या स्थानावर आहे. येथे ३.३ टक्के महिला दारू पितात. सिक्कीम आणि छत्तीसगड चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत, जिथे ०.३ आणि ०.२ टक्के महिला दारू पितात. तसेच अरुणाचल प्रदेशात पुरुष सर्वाधिक दारू पितात. येथे १५ ते ४९ वयोगटातील ५९ टक्के पुरुष दारू पितात. पूर्वी झारखंड आणि त्रिपुरामध्ये महिलांमध्ये दारूच्या व्यसनाचे प्रमाण जास्त होते. झारखंडमध्ये ९.९% आणि त्रिपुरामध्ये ९.६% महिला दारू पित होत्या. मात्र, आता हा आकडा झारखंडमध्ये ०.३% आणि त्रिपुरामध्ये ०.८% पर्यंत घसरला आहे.

महाराष्ट्र, दिल्ली आणि कर्नाटक यांसारखी मोठ्या कॉर्पोरेट क्षेत्रातील राज्ये या यादीत फारसे आढळली नाहीत. मोठ्या शहरी संस्कृतीमुळे या राज्यांमध्ये मद्यपानाचे प्रमाण अधिक असेल, असे वाटत होते. मात्र, सर्वेक्षणातून वेगळीच आकडेवारी समोर आली आहे.