
‘या’ महिलांना मिळणार तीन हजार रुपये, जाणून घ्या काय आहे अपडेट, सविस्तर वाचा

मुंबई – महायुती सरकारची लाडकी बहिण योजना ही राज्यातील सर्वाधिक चर्चेची योजना आहे. लाडकी बहिण योजनेनेमुळेच महायुती सरकारला दुसऱ्यांदा राज्यात सत्ता मिळाली आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात. आता एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रातील नजरा एप्रिलच्या हप्त्यावर आहेत. आता एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दल अशी अटकळ बांधली जात आहे की, तो एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात महिलांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो. मात्र सरकारने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु गेल्या वेळीप्रमाणे यावेळीही वेळेवर पैसे मिळण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे लाडक्या बहीणींना एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. जुलै 2024 पासून या योजनेची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात सुरु झाली. आत्तापर्यंत लाडकी बहिण योजनेचे ९ हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले. मात्र अजून एप्रिलचा १० हप्ता मिळालेला नाही. मात्र मिळालेल्या माहीतीनुसार एप्रिलच्या महिन्याच्या ३० तारखेला लाडक्या बहीणांना त्यांचा हप्ता मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र महायुती आघाडीने माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र जेव्हा राज्याची आर्थिक स्थिती सुधारेल तेव्हा ती वाढवण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. याआधी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे दोन हप्ते एकत्रित देण्यात आले, ज्यामुळे महिलांना एकत्र ३ हजार रुपये प्राप्त झाले होते. तथापि या संदर्भात अजून तरी कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यामुळे एप्रिलचा हप्ता नेमका कधी मिळणार? याची अधिकृत तारीख कधी समोर येणार हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे.
एप्रिल महिन्यात काही महिलांना वाढीव रक्कम म्हणजेच ३ हजार रुपये मिळणार आहे. मार्च महिन्यात काही तांत्रिक अडचणीमुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला नाही त्यामुळे एप्रिल महिन्यात अक्षय तृतीयाच्या निमित्ताने ३ हजार रुपये खात्यात जमा केले जाणार आहेत.









