
लग्नासाठी अभिनेत्री बनली होती हिंदू, लेडी सुपरस्टार म्हणाली जेव्हा आपण स्वतःबद्दल विचित्र..

चेन्नई – साऊथ सिनेइंडस्ट्रीतील सुपरस्टार नयनतारा अचानक चर्चेत आली आहे. पण यावेळेस ती तिच्या चित्रपटांमुळेच नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीचा घटस्फोट होणार अशी चर्चा सुरु झाली आहे.


सोशल मीडियावर एक बनावट स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नयनतारा तिच्या लग्नाला मोठी चूक म्हणत असल्याचे दिसून आले. तेव्हापासून, तिच्या लग्नात समस्या निर्माण झाल्याच्या बातम्या पसरू लागल्या आणि अभिनेत्री तिचा पती विघ्नेशला घटस्फोट देणार असल्याचे बोलले जात आहे. पण या अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अफवांना उत्तर म्हणून नयनताराने एक पोस्ट शेअर केली आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटच्या स्टोरीवर ही पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये ती पती विघ्नेशसोबत दिसली आणि दोघेही विचित्र आणि आश्चर्यकारक प्रतिक्रिया देताना दिसले. हे शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ”आमची प्रतिक्रिया… जेव्हा आपण स्वतःबद्दल विचित्र बातम्या पाहतो..” नयनताराने २०२२ मध्ये विघ्नेश शिवनशी लग्न केले. लग्नानंतर हे जोडपे जुळ्या मुलांचे पालक बनले. कामासोबतच दोघेही सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहेत. तसेच दोघेही मुलांसोबतचे फोटो शेअर करत असतात. दोघेही नेहमीच एकमेकांसोबतचे रोमॅन्टिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशा परिस्थितीत घटस्फोटाच्या बातम्या केवळ खोट्या आणि निराधार असल्याचे सिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे लग्नासाठी नयनताराने हिंदू धर्म स्वीकारला होता. नयनताराचा जन्म कर्नाटकमधील एका सामान्य कुटुंबात झाला. तिचे वडील सेना अधिकारी कुरियनकोडियाट्टू आणि आई ओम्मनकुरियन आहेत. डायना मरियम कुरियन हे तिचं खरं नाव आहे. दरम्यान सध्या नयनतारा एका सिनेमासाठी ५ ते १० कोटी रुपये घेते. अभिनेत्रीची एकूण संपत्ती २०० कोटींपेक्षा जास्त आहे.

नयनताराने २००५ मध्ये ‘अय्या’ सिनेमातून तिनं तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. हा सिनेमा खूप गाजला. त्यामुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली. नयनताराने शाहरुख खानसोबत ‘जवान’ या सिनेमात काम केलंय. हा सिनेमा तिच्या करियरमधील खूप मोठा टर्निंग पॉईंट ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली.










