शिंदे गटाच्या या मंत्र्याची पदावरून हकालपट्टी होणार?

पालकमंत्री पद न भेटल्याने उघड नाराजी, भाजपाकडून नाराजी व्यक्त करत दुहेरी झटका, काय घडल?

रायगड – महायुती सरकारची पालकमंत्री यादी जाहीर झाली असून मंत्री दादा भुसे व भरत गोगावले यांना कोणत्याही जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे दोघेही नाराज झाले आहेत. गोगावले यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. त्यामुळे युतीत तणाव निर्माण झाला आहे.

रायगडच्या पालकमंत्रीपदी राष्ट्रवादीच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची निवड केल्याने गोगवले यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. रायगडच्या पालकमंत्रीपदी आपलीच नियुक्ती होईल, असा विश्वास गोगावले  यांना होता. पण तो फोल ठरला. त्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना भरत गोगावले म्हणाले की, हा आमच्या मनाच्या विरुद्ध घडलेला प्रकार आहे त्यामुळे आम्ही नाराज आहोत. घरामध्ये चुलीपर्यंत सामोरा जाणारा मी एकमेव आमदार आहे, याची कार्यकर्ते, पदाधिकारी यांना खात्री आहे. त्यामुळे त्यांना जी आपुलकी आहे, भावना आहे, ती त्यांनी व्यक्त केली आहे, असे भरत गोगावले यांनी सांगितले. तसेच त्यांनी संतप्त कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केले आहे. तसेच मी एकनाथ शिंदे यांची यासंदर्भात भेट घेणार आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. जिल्ह्यातील शिवसेनेच्या तीन आणि भाजपच्या तीन अशा सहा आमदारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटून आदिती तटकरे या रायगडच्या पालकमंत्री पदी नको असे सांगितले होते. जिल्ह्यात सर्वांनाच मला पालकमंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. याचे वाईट वाटत आहे. असा दावा देखील त्यांनी केला आहे.

महायुती सरकारचे मंत्री भरत गोगावले यांच्यावर देखील कारवाई केली जाऊ शकते.गोगावले यांना मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री करण्यात आले आहे. तरीही ते एसटी महामंडळाचे अध्यक्षपदी आहे. अशा परिस्थितीत त्यांना देखील पदावरून हटवण्याचा आदेश लवकरच निघू शकतो.