
लग्नापूर्वीच गेली सासू-सासऱ्यांना भेटायला, व्हिडिओ व्हायरल, कोण आहे होणारा उद्योगपती पती?

मुंबई – अभिनेत्री कृती सेनन तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असते. बऱ्याच काळापासून तिच्या बिझनेसमन कबीर बहियासोबतच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत आहेत. तथापि, दोघांनीही कधीही त्यांच्या नात्याची पुष्टी केलेली नाही. आता दोघेही लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या येत आहेत.


आपल्या सौंदर्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत राहणारी क्रिती सेनन सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून अभिनेत्रीच्या बिझनेसमन कबीर बहियासोबतच्या अफेअरच्या चर्चा सुरु आहेत. पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार, दोघेही आपआपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी दिल्लीला गेले आहेत. कृती आणि कबीरला अलीकडेच पापाराझींच्या कॅमेऱ्यात एअरपोर्टवर एकत्र स्पॉट करण्यात आले आहेत. यावेळी, कृतीने मास्क घातला होता. त्यासोबतच ब्लॅक गॉगल आणि टोपी घातली होती. शिवाय, डेनिम जीन्स आणि काळ्या जॅकेटने तिचा लूक पूर्ण केला होता. कबीर बहिया देखील पूर्णपणे काळ्या लूकमध्ये दिसला. त्यांच्या लग्नाच्या बातम्यांदरम्यान ते त्यांच्या पालकांना भेटायला गेल्याच्या चर्चा सुरू आहेत. दोघेही या वर्षाअखेरीस लग्न करणार आहेत. कबीर बाहिया, यूके-स्थित बिझनेसमॅन आहे. लंडनमधील एका श्रीमंत कुटुंबातील असून, त्यांचे वडील कुलजिंदर बाहिया यांनी साउथॉल ट्रॅव्हलचे संस्थापक आहेत. कबीर हा भारतीय क्रिकेटपटू एमएस धोनी त्याचे नातेवाईक आहेत.
क्रिती सेनन लवकरच धनुषसोबत ‘तेरे इश्क में’ या चित्रपटात काम करणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी अलिकडेच या सिनेमाचा एक टीझर रिलीज केला होता. क्रिती लवकरच लग्नगाठ बांधणार आहे का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.










