महाराष्ट्राची क्रश असणारी ही अभिनेत्री करणार लग्न?

Oplus_131072

अभिनेत्री लवकरच अडकणार विवाह बंधनात, अभिनेत्री तरूण शेतकऱ्याच्या प्रेमात?

मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ता ही तिच्या चित्रपटांसोबतच कायम खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

युट्यूब चॅनेलवरील ‘आम्ही असं ऐकलंय’ या कार्यक्रमात प्राजक्ता माळी सहभागी झाली होती. यावेळी तिने लग्नाला तयार असल्याचं सांगत आईला मुलं बघण्याची परवानगी दिल्याचं म्हटले आहे. तसेच स्थळे देखील आल्याची माहिती दिली आहे. ती म्हणाली “माझ्यासाठी मुलं शोधण्याकरिता अखेर मी आईला आता परवानगी दिली आहे. ही ब्रेकिंग न्यूज आहे. काही दिवसांपूर्वी मी उडतं उडतं असंच कुठेतरी बोलले होते, तर आईला खरंच दोन पत्र आली आहेत. मला ती पत्र इतकं आवडली आहेत. मला असं वाटतंय त्यांना फोन लावावा. कारण त्यातील एका पत्रामध्ये त्यांनी खूप प्रांजळपणे म्हटलेलं आहे की, मी शेतकरी आहे. मला माहिती आहे हे काहीतरी वेगळ्या पद्धतीने बोलतोय. तुमचं क्षेत्र वेगळं आहे. पण मला हे प्रांजळपणे मांडायचं आहे, मी शेतकरी आहे. मी शेतीचं करणार, तुम्हाला आवडणार असेल तर मला तुमच्याशी लग्न करायचं आहे.” हे पत्र मला आवडले असेही ती म्हणाली आहे, पण हे पत्र कोणी लिहिले आहे आणि दुसरे पत्र कोणाचे आहे याची माहिती मात्र तिने दिलेली नाही. दरम्यान, प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’ चित्रपटाला नुकतंच ‘झी चित्र गौरव २०२५’ सोहळ्यात गौरविण्यात आलं. एक-दोन नव्हे तर ‘फुलवंती’ चित्रपटाला तब्बल सहा पुरस्कार मिळाले आहेत.

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटात प्राजक्ता अभिनेता स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे, प्रथमेश शिवलकर, रोहित माने, वनिता खरात यांच्यासह झळकणार आहे. या चित्रपटाकडून तिला भरपूर अपेक्षा आहेत.