
कपलच्या घटस्फोटाचं धक्कादायक कारण समोर, लग्नाच्या चार वर्षांनी घटस्फोटाचा निर्णय, यामुळे झाला घटस्फोट?

मुंबई – भारतीय क्रिकेट क्षेत्रातील दिग्गज खेळाडू युझवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर युट्यूबर धनश्री वर्मा यांच्या वैयक्तिक आयुष्यात काहीही ठीक नसल्याच्या चर्चा आपण सोशल मिडियाच्या माध्यमातून पाहत होतो. पण आता अखेरी या दोघांचा कायदेशीर घटस्फोट झाला आहे.


भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला आहे. दोघेही १८ महिन्यांपासून एकमेकांपासून वेगळे राहत होते. महत्वाचे म्हणजे अंतिम सुनावणी गुरुवार, २० फेब्रुवारी रोजी वांद्रे कुटुंब न्यायालयात झाली, त्या वेळी धनश्री आणि युजवेंद्र उपस्थित होते. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, या जोडप्याने अधिकृतपणे वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, घटस्फोटानंतर युजवेंद्र चहलला धनश्रीला ६० कोटी रुपयांची पोटगी द्यावी लावण्याची शक्यता आहे. न्यायाधीशांनी विचारले असता, चहल आणि धनश्री यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याची इच्छा असल्याचे मान्य केले. वकिलाने खुलासा केला की अंतिम निर्णय घेण्यापूर्वी दोघेही गेल्या 18महिन्यांपासून वेगळे राहत होते. यानंतर न्यायाधीशांनी दोघांच्या घटस्फोटाला अधिकृत मान्यता दिली.गेल्या काही दिवसांपासून सतत दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला होता. युजवेंद्र चहल आणि पत्नी धनश्री यांच्यात वाद असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत होती. पण ही निव्वळ चर्चाच असावी असंच चाहत्यांना वाटत होतं. महत्वाचे म्हणजे या वर्षाच्या सुरुवातील दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलं होतं. अनफॉलो केल्यानंतर चहल आणि धनश्रीने आपल्या नात्याबाबत काहीच स्पष्ट केलं नाही. अद्यापही घटस्फोटावर या दोघांनी कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. दरम्यान चहलने ७२ एकदिवसीय आणि ८० ट्वेन्टी२० सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केले आहे. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा मान देखील चहलच्या नावावर आहे.

चहल आणि धनश्री यांच लग्न २०२० साली झाले होते. सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. धनश्री डान्स कोरियोग्राफर असल्यामुळे दोघे ही डान्सचे रील करून सोशल मिडियावर पोस्ट करत असत आणि त्यांच्या फॅन्सला देखील ते आवडत असे.










