जूनमध्ये पावसाचा जोर ओसरणार की वाढणार? अंदाज काय?*

पेरणीबाबत सरकारचे शेतक-यांना महत्वाचे आवाहन, जूनच्या पावसाबाबत हवामानाचा अंदाज काय?

मुंबई – महाराष्ट्राच्या विविध भागांत गेल्या ५ दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे २१ जणांचा मृत्यू झाला असून १२ जखमी झाले आहेत. त्यात पाण्यात बुडून, वीज कोसळून तसेच भिंत कोसळून मृत्यू पावलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. वेळेपुर्वी आलेल्या मान्सुनने अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता पावसाची अपसेट समोर आली आहे.

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे यावर्षी मान्सून लवकर दाखल झाला आहे. मात्र, आता बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता उत्तरेला सरकल्यामुळे महाराष्ट्रात पाच ते सहा दिवस पाऊस विश्रांती घेईल. उपग्रह आणि रडारवरून मिळालेल्या हवामान नमुन्यांवर आधारित ३ ,५ आणि ७ दिवसांचे अंदाज तयार केले जातात. सध्या, आजपासून हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. दुसरा टप्पा २ जूनपर्यंत सुरू राहील आणि ५ जूननंतर मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. राज्यात मान्सूनपूर्व पाऊस खूप जास्त पडल्याने शतक-यांना मशागतीची कामे करताचा आली नाही. पावसाचा जोर इतका होता की जमीनीला वाफसा येईल की नाही. मशागतीची कामे करता येतील की नाही. या बाबत शेतकरी चिंतेत सापडला आहे. या बाबत हवामान तज्ज्ञांचे मत घेतले असता त्यांनी सांगितले की, आता पावसात मोठा खंड पडू शकतो.कारण हवेचे दाब राज्यात वाढले आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यांत ३० मे ते ६ जून तर दुस-या टप्प्यात ६ जून ते १० जून असा खंड राहू शकतो. बंगालच्या उपसागरात मान्सून पुढे सरकला आहे. पण अरबी समुद्रात मान्सूनचा वेग मंदावला आहे. गुरुवारी विदर्भासह छत्तीसगड, ओडिशाचा काही भाग आणि पूर्वोत्तर राज्यांसह सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या काही भागात मान्सून दाखल झालाय. पूर्व भारतात मान्सूनसाठी पोषक वातावरण आहे. तर महाराष्ट्रात मान्सून पुढे सरकरण्यासाठी आणखी वाट बघावी लागणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, हा कमी दाबाचा पट्टा हळूहळू उत्तरेकडे सरकणार आहे. पुढील 48 तासांमध्ये त्याची दिशा अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मात्र याचा परिणाम म्हणून केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या किनारी भागांमध्ये पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

राज्यात सर्व जिल्ह्यात पावसाची नोंद झालेली आहे. जोरदार पावसामुळे काही ठिकाणी नद्यांना पूर देखील आला होता. मात्र सध्यास्थितीत पूर परिस्थिती नियंत्रणात असून कुठेही पूर आल्याची घटना घडलेली नाही. यंदा मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा अधिक होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे.