
व्यापारासाठीची अटारी सीमा बंद, भारत पाकिस्तान संबंधात तणाव, व्यापारबंदीमुळे कोणाचे होणार नुकसान?

दिल्ली – पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. भारताने अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. यात सिंधूकरार रद्द करण्याबरोबरच व्यापार देखील थांबवला आहे. तिकडे पाकिस्तानने देखील प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे व्यापारावर परिणाम झाला आहे.

भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार मोठ्या प्रमाणात होतो. अशा परिस्थितीत, पाकिस्तानशी संबंध संपुष्टात आल्यास भारतात अनेक गोष्टी महाग होऊ शकतात. भारत पाकिस्तानकडून सुका मेवा, सैंधव मीठ, चष्म्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ऑप्टिकल लेन्स, फळे, सिमेंट, मुलतानी माती, कापूस, स्टील आणि चामड्याच्या वस्तूंची आयात करतो. सर्व उत्पादने पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणात भारतात येतात. पण आता भारत आणि पाकिस्तानमधील व्यापारात बदल होऊ शकतात. ज्यामुळे या सर्व गोष्टी महागही होऊ शकतात. पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध पूर्णपणे संपुष्टात येत आहेत. सरकारच्या सर्व मोठ्या निर्णयांनंतर, त्याचा परिणाम भारत आणि पाकिस्तानमधील व्यापारावर दिसून येतो. भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार मोठ्या प्रमाणात होतो. अशा परिस्थितीत, पाकिस्तानशी संबंध संपुष्टात आल्यास भारतात अनेक गोष्टी महाग होऊ शकतात. दरम्यान चालू आर्थिक वर्षात (एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२५), पाकिस्तानसोबत व्यापार बंदी असूनही भारताने ४४७.७ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ३,७२० कोटी रुपये) किमतीच्या वस्तूंची निर्यात केली. तर दुसरीकडे, भारताची पाकिस्तानमधून होणारी आयात खूपच कमी राहिली, ती फक्त ०.४२ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ३.५ कोटी रुपये) इतकी होती. यामध्ये काही विशिष्ट कृषी उत्पादनांचा समावेश होता. दरम्यान हलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानवर दबाव वाढवण्यासाठी भारताने अटारी सीमा बंद केल्यामुळे दोन्ही देशांमधील उरलासुरला व्यापार व्यवहारही संपुष्टात आला. भारताने गुरुवारी आणखी कडक पावले उचलत वैद्याकीय उपचारांसाठी आलेल्या पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसाही रद्द केला असून त्यांना २७ एप्रिलपूर्वी भारत सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अटारी-वाघा सीमा बंद केल्याने दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेवर आणि स्थानिक लोकांवर खोलवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे पंजाबच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला, विशेषतः अमृतसर आणि आसपासच्या परिसराला मोठा धक्का बसणार आहे.









