आज सोन्याच्या दरात घट की वाढ? जाणून घ्या!

तीन महिन्यात सोन्याच्या दरात झाली तब्बल इतक्या रुपयांची वाढ? पाहा तुमच्या शहरातील भाव

पुणे – सध्या लग्नसराई सुरू आहे. परिणामी दागिन्यांची मागणी वाढली आहे. यामुळे सोन्याचा दर नवनवीन उच्चांक गाठताना दिसून येत आहे.गेल्या ३ महिन्यांत सोन्याचे दरात ११ हजार रुपयांनी वाढ झाली आहे. पण आठवड्यच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी मात्र दर उतरले आहेत.

सोने आणि चांदीच्या दराने गेल्या तीन महिन्यांत मोठा उच्चांक गाठवा आहे. सोन्याचा सर्वोच्च दर ९१००० रुपये प्रति १० ग्रॅम नोंदवण्यात आला होता. तर चांदीचा दर १,०२,५०० रुपयांवर पोहोचला होता. सोन्याचा दर १ जानेवारीला प्रति १० ग्रॅम ७३३९० रुपये होता. तर २१ मार्चपर्यंत तो ९०८४० रुपयांवर पोहोचला होता. म्हणजेच तीन महिन्यांत दरांत ११४५० रुपयांची म्हणजे १४.३४ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण आणि चांदीच्या किंमतीत तेजी यामागे मुख्य कारण आहे डॉलरमध्ये होणारी घसरण आणि नफावसुलीचे परिणाम. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं ३०५० डॉलरवर स्थिरावले आहे. सोन्यासह चांदीच्याही दरानेही उच्चांक गाठला आहे. भाववाढीचा वाढता आलेख पाहता सोन्याचा दर लवकरच लाखाचा टप्पा ओलांडण्याची शक्यता सुवर्णकारांनी व्यक्त केली आहे. त्यातच मध्यमवर्गीय लग्नसराईसाठी सोने खरेदीचा विचार करताना दिसत आहेत.

आईबीजेए वेबसाईट रेट्सनुसार पुण्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ८२१५० रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ८९,६२० रुपये आहे.
१८कॅरेट सोन्याचा भाव ६७२२० रुपये आहे. दरातील चढउतार यापुढही कायम राहणार आहेत.