लवकरच सोन्याचा दर होणार ५५ हजार प्रतितोळा?

Oplus_131072

सोन्याच्या दरात या कारणामुळे होणार मोठी घसरण, कोणी व्यक्त केला अंदाज? काय आहे कारण?

मुंबई – गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या दरात प्रचंड तेजी दिसून येत आहे. सोन्याचा भाव सध्या उच्चांकावर पोहोचला आहे. यामुळे सोने खरेदीसाठी नागरिकांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. पण लवकरच सोन्याच्या दावात घसरण होण्याची शक्यता आहे.

नुकताच गुढीपाडवा पार पडला. यादिवशी अनेकांनी सोने खरेदीला प्राधान्य दिले. सध्या सोन्याचा दर ९० हजाराच्या घरात पोहोचला आहे. पण लवकरच सोन्याच्या दरात मोठी घसरण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या काही वर्षांत सोन्याच्या दरात मोठी घसरण होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सोन्याच्या दरात तब्बल ३८ टक्क्यांपर्यंत घसरण होण्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. अमेरिकन फायनान्शिय सर्व्हिसेस फर्म मॉर्निंगस्टार ने हा अंदाज वर्तवला आहे. सोन्याचा दर प्रति औंस १८२० डॉलरपर्यंत घसरु शकतात. सध्याच्या उच्चांकी दरापासून हा दर ३८ टक्क्यांनी खाली आहे. म्हणजेच सोन्याच्या दरात ३८ टक्क्यांपर्यंत घसरण होऊ शकते. हेच भारतीय चलनात मोजल्यास भारतात सोन्याचा दर प्रति तोळा ५५४९६ रुपये इतका होऊ शकतो. जो आत्ताच्या किमतीच्या तुलनेत ३५ हजार रूपयांनी कमी आहे. अनेक देशांत सोन्याच्या खाणी मोठ्या प्रमाणात खाणकाम सुरू आहे. अनेक देश मोठ्या प्रमाणात सोन्याचे उत्पादन वाढवत आहेत. याशिवाय, जुन्या सोन्याचेही मोठ्या प्रमाणात पुनर्वापर केले जात आहे. यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या सोन्याचे प्रमाण आणखी वाढत आहे. पुरवठ्यात वाढ झाल्यामुळे किमतींवर दबाव वाढेल आणि सोने स्वस्त होण्याची शक्यता आहे. अर्थात यात काही मतभेद देखील आहेत. काही जाणकार हे सोन्याच्या दरात घसरण नाही तर उलट सोन्याच्या दरात येत्या काळात आणखी तेजी दिसण्याची शक्यता आहे. असा अंदाज व्यक्त करत आहेत.

सोन्याच्या दरात होत असलेल्या वाढीमागे अनेक कारणे आहेत. भू-राजकीय तणाव, अमेरिकन अर्थव्यवस्थेबद्दल अनिश्चितता, वाढत्या महागाईची भीती, शेअर बाजारातील घसरणीमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदी तसेच जगातील प्रमुख देशांकडून सुरू असेलेली सोने खरेदी अशी विविध कारणे सोन्याच्या दरवाढीमागे आहेत.