दहावी किंवा बारावीला आहात का मग ही बातमी वाचाच!

माध्यमिक शिक्षण मंडळाचे मोठे निर्णय, हे नियम पाळले नाहीतर तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाही, नेमका निर्णय काय?

दिल्ली – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईने दहावी व बारावीच्या परीक्षांसंदर्भात महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना पुन्हा प्रसिद्ध केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यार्थ्यांनी नियमितपणे शाळेत हजेरी लावून किमान ७५ टक्के उपस्थिती राखणे अनिवार्य आहे. तसेच इतरही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

दहावी – बारावी बोर्डाच्या परीक्षेत पहिला दिवशी हिंदी किंवा मराठीचा पेपर घेण्यात येतो. पण आता या नियमात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आाल आहे. माध्यमिक शिक्षण मंडळाने हिंदी भाषेच्या पेपरच्या ऐवजी सोप्पा विषयाचा पेपर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना तणाव येऊ नये आणि अख्खा परीक्षेदरम्यान वातावरण तणावमुक्त राहावे यासाठी महत्त्वपूर्ण नियम घेण्यात आला आहे. पण बोर्डाकडून पहिला सोप्पा पेपर कुठला असेल याबद्दल अद्याप काही स्पष्ट सांगण्यात आलेले नाही. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांनी नियमितपणे शाळेत हजेरी लावून किमान ७५ टक्के उपस्थिती राखणे अनिवार्य असणार आहे. तुमची शाळेतील हजेरी ही ७५ टक्के खाली असेल तर तुम्ही परीक्षेसाठी पात्र ठरणार नाही, असं ‘सीबीएसई’ने स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे, बारावीची परीक्षा देण्यासाठी अकरावी आणि बारावी या दोन्ही वर्षांचा अभ्यास पूर्ण करणे गरजेचे राहणार आहे. त्याचप्रमाणे दहावीसाठी नववी आणि दहावी या दोन्ही वर्षांचा अभ्यास पूर्ण करणे गरजेचे आहे. केवळ अंतिम वर्षी शिकून परीक्षा देता येणार नाही, असा इशारा मंडळाने विद्यार्थ्यांना दिला आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी हे नियम अत्यंत महत्त्वाचे ठरतील.

दहावीचे विद्यार्थी पाच अनिवार्य विषयांव्यतिरिक्त जास्तीत जास्त दोन अतिरिक्त विषय घेऊ शकतात, तर बारावीचे विद्यार्थी एक अतिरिक्त विषय घेऊ शकतात. या अतिरिक्त विषयांचा अभ्यासही दोन वर्षे करावा लागेल. वरील अटी पूर्ण न करणारे खाजगी उमेदवार अतिरिक्त विषयांसाठी बोर्ड परीक्षेत बसण्यास पात्र नसतील.