
मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितली तारीख, या महिला ठरणार अपात्र, नक्की काय सांगतो कायदा?

मुंबई – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता महिना संपायच्या अगोदर प्राप्त होईल, असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात तो जमा होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी २ कोटी ४७ लाख आहेत. यावेळी तटकरे यांनी अनेक चर्चांना उत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, “योजनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ज्या महिलांच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्यांनाच पहिल्यापासून निधी दिला जातो, नमो शेतकरी योजनेतून ज्या महिलांना एक हजार रुपये मिळतात त्यांना ५०० रुपये मिळतील हे योजनेचे दोन शासन निर्णय होते त्यामध्येच निश्चित करण्यात आलं होतं, असं देखील त्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै २०२४ पासून सुरु करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना आतापर्यंत दीड हजार रुपयांप्रमाणं ९ महिन्यांचे १३५०० रुपये मिळाले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी आणि मार्च २०२५ ची रक्कम ८ मार्च ला आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं एकाच वेळी देण्यात आली होती. आता लाडक्या बहिणींना अक्षय्य तृतीयेच्या च्या निमित्तानं त्यावेळी दिला जाईल अशी शक्यता आहे. या योजनेसाठी १ जानेवारी २०२४ रोजी २१ वर्षे पूर्ण केलेल्या महिला पात्र होत्या. मात्र, अनेक महिलांनी या तारखेनंतर वयाची अट पूर्ण केली आहे किंवा इतर निकषांमुळे त्या नंतर पात्र ठरल्या आहेत. दरम्यान योजना गेल्यावर्षी सुरू झाली. ही योजना मध्यप्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आली असून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने या योजनेचा शुभारंभ केला होता.
सध्या योजनेसाठी नवीन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया बंद आहे. त्यामुळे १ जानेवारी २०२४ नंतर २१ वर्षे पूर्ण केलेल्या किंवा इतर कारणांमुळे नव्याने पात्र ठरलेल्या महिला अर्ज करू शकत नाहीत. या महिलांना योजनेत कसे समाविष्ट केले जाईल आणि त्यांना लाभ कधीपासून मिळेल, याबाबत शासनाकडून कोणतीही अधिकृत घोषणा किंवा मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेली नाही.









