सावधान! महाराष्ट्रातील या १८ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस

येत्या २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता, महाराष्ट्रावर ‘या’ तारखेपर्यंत राहणार अवकाळीचे सावट

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये वादळी वारा, गारांचा पाऊस आणि अवकाळी पाऊस यांच्या येण्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

मे महिन्यात अनेक पिके काढणीला आलेली असताना अवकाळीने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पण आता हवामान खात्याने पुन्हा विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागात वादळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे राज्यातील अवकाळीचा मुक्काम वाढल्याचे बोलले जात आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, दक्षिण कोकण,गोवा आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागात ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा मुक्काम वाढणार असून कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही अवकाळी पाऊस जोरदार हजेरी लावणार आहे. यासोबतच, मराठवाड्यापासून उत्तर अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडू ते थेट मन्नारच्या आखातापर्यंत हवेचा एक दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा देखील कायम आहे. या दोन्ही वातावरणीय प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे राज्यात पूर्वमोसमी पावसासाठी अत्यंत पोषक हवामान निर्माण झाले असून, त्यामुळेच अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाने राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम आणि यवतमाळ या १८ जिह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.

यंदा र्नैऋत्य मोसमी पाऊस नियोजित वेळेत भारतात दाखल होण्याची चिन्हे आहेत. केरळमध्ये २७ मे रोजी मोसमी पाऊस दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी १९ मे रोजी अंदमान-निकोबार बेटांवर र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी धडक दिली होती. यंदा देशात चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे