विजय वडेट्टीवार यांनी केली मतदारांना शिवीगाळ, व्हिडिओ व्हायरल; वादग्रस्त व्हीडिओवरून भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता जोरात सुरुवात झाली आहे. त्यातच उमेदवारांच्या प्रचारासाठी सभांचे आयोजन करण्यात येत आहे. या सभेत नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहे.

अशात काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.या व्हिडिओत विजय वडेट्टीवार यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप भाजप पक्षाकडून केला जात आहे. सोशल मीडियावर भाजप पक्षाकडून हा व्हिडिओ शेअर करत काँग्रेसवर टीका करण्यात आली आहे.व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत विजय वडेट्टीवार भाषणाच्या सुरुवातीला ते म्हणाले, मी आयुष्यात कुणाला कधीही धमकी दिली नाही …’ असं म्हणत ते त्यांच्यावर आरोप करण्यांना आक्षेपार्ह भाषेत बोलतांना दिसत आहे.

 

दरम्यान भाजपने सोशल मीडिया खात्यावर हा व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की,’काँग्रेसचा हात, मतदारांचा घात… कॉंग्रेस नेते, विजय वडेट्टीवार मतदारांना हरा*खोर म्हणत आहेत. २० तारखेनंतर तुला पाहून घेईन. तुमचे नाव लिहून ठेवले आहेत. अशी धमकीच त्यांनी मतदारांना दिली आहे. लोकशाहीत मतदार हा राजा असतो मात्र लोकशाही, संविधान, अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा काँग्रेसला सुरुवातीपासूनच तिटकारा आहे.ज्या काँग्रेसने संविधानाची पायमल्ली करत देशावर आणीबाणी लादली असंख्य सामान्य लोकांना तुरूंगात डांबून ठेवले ती काँग्रेस पुन्हा मतदारांना धमकवण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्राची जनता मतदानातून काँग्रेसची ही मस्ती नक्कीच उतरवणार…