
वाढीत आयातशुल्कामुळे या वस्तू महागणार, भारतावर किती शुल्क, पहा पूर्ण यादी

दिल्ली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह जगभरातल्या देशांवर आयात कर लागू केला आहे. सर्व देशांवर सरसकट १० टक्के कर लागू केले असून काही निवडक देशांवर Resiprocal Tariff लागू करण्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत केली. यामुळे देशातील अनेक वस्तू महागणार आहेत.

अमेरिकेत आयात होणाऱ्या भारतीय वस्तुंवर २६ टक्के आयातशुल्क लादण्याचा निर्णय घेतला गेला आहे. याबरोबरच अमेरिकेकडून हे स्पष्ट केले गेले आहे की ज्या देशांवर आयातशुल्क लादण्याचा निर्णय झाला आहे. त्या देशांकडून जर या आयातशुल्कवाढील प्रतिक्रिया दिली गेली नाही तर या आयातशुल्कात वाढ होणार नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबाबत प्रतिक्रिया देताना भारतसुध्दा भारतात आयात होणाऱ्या अमेरिकी वस्तुंवर आयातशुल्क लादतो त्यामुळे भारतावरही आयातशुल्क लादण्याचा निर्णय घेतला गेला आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आयातीवर लागू केलेल्या १० टक्के युनिव्हर्सल टॅरिफमुळे येत्या काही आठवड्यात किंवा महिन्यांत काही उत्पादने महागण्याची दाट शक्यता आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणे, iPhones, टीव्ही, ऑटोमोबाईल्स, कपडे, शूज, वाइन, स्पिरिट्स, फर्निचर, कॉफी, चॉकलेट, स्विस घड्याळे यावस्तू महागणार आहेत.
देश आणि टॅरिफ
चीन 34%
युरोपियन युनियन 20%
व्हिएतनाम 46%
तैवान 32%
जपान 24%
भारत 26%
दक्षिण कोरिया 25%
थायलंड 36%
स्वित्झर्लंड 31%
इंडोनेशिया 32%
मलेशिया 24%
कंबोडिया 49%
युनायटेड किंगडम 10%
दक्षिण आफ्रिका 30%
ब्राझील 10%
बांगलादेश 37%
सिंगापूर 10%
इस्रायल 17%
फिलिपिन्स 17%
चिली 10%
ऑस्ट्रेलिया 10%
पाकिस्तान 29%
तुर्की 10%
श्रीलंका 44%









