उमेश कुमार यांची हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाला भेट

हडपसर प्रतिनिधी – निवडणूक आयोगाकडून हडपसर विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक खर्च पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आलेले उमेश कुमार (आय.आर.एस.)-(सी अँड सी.इ.) यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय – पुणे महानगपालिकेचे विठ्ठल तुपे नाट्यगृह, हडपसर येथे भेट दिली. २१३- हडपसर विधानसभा मतदार संघ ०९-११-२०२४ रोजी खर्च पर्यवेक्षक उमेश कुमार (आय.आर.एस.)-(सी अँड सी.इ.) यांच्या प्रमुख उपस्थितीत व डॉ.स्वप्नील मोरे निवडणूक निर्णय अधिकारी, यांचे अध्यक्षतेखाली सर्व १९ उमेदवारांची प्रथम खर्च तपासणी पार पडली.

तपासणी दरम्यान जिल्हा समन्वय अधिकारी – महेश सुधळकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी – नागनाथ भोसले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी – अमोल पवार, नायब तहसीलदार श्रीमती जाई कोंडे तसेच सर्व विभागाचे नोडल अधिकारी, सहायक खर्च निरीक्षक – श्रीमती सुषमा पाटील व राकेश रंजन तसेच सहाय्यक खर्च निरीक्षक (जिल्हा स्तरीय) – विकास खामकर व सुभाष पाडेकर आणि श्रीमती वनिता बाविसकर, नोडल अधिकारी – उमेदवार खर्च ताळमेळ समिती, उमेदवार खर्च ताळमेळ समितीमधील सर्व सदस्य, काही उमेदवार व सर्व १९ उमेदवारांचे खर्च प्रतिनिधी उपस्थित होते.खर्च पर्यवेक्षक उमेश कुमार (आय.आर.एस.)-(सी अँड सी.इ.) यांनी उमेदवारांच्या खर्चाबाबत मार्गदर्शक सूचना केल्या. उपस्थित सर्व उमेदवार व सर्व १९ उमेदवारांचे खर्च प्रतिनिधी यांनी तपसणी प्रक्रियेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

तसेच प्रश्न विचारून आपल्या शंकाचे निरसन करून घेतले. मा. खर्च पर्यवेक्षक यांनी तेवढ्याच उस्फुर्तपणे उमेदवार व सर्व १९ उमेदवारांचे खर्च प्रतिनिधी यांच्या प्रश्नांचे समाधान केले. यावेळी मा. खर्च पर्यवेक्षक उमेश कुमार (आय.आर.एस.)-(सी अँड सी.इ.) यांनी उपस्थित सर्व उमेदवार व सर्व १९ उमेदवारांचे खर्च प्रतिनिधी यांना निवडणूक खर्चाबाबत काही शंका अथवा तक्रारी असल्यास त्यांचा भ्रमणध्वनी क्र. ७७६८०३६२३० वर संपर्क साधून अथवा मेसेज किंवा व्होट्स अॅप मेसेजद्वारे कळविणेबाबत सूचना केल्या आहेत. सर्व उमेदवारांच्या निवडणूक विषयांच्या खर्चाची दुसरी तपासणी दि. १३ नोव्हेंबर २०२४ रोजी तर तिसरी तपासणी १७ नोव्हेंबर २०२४ रोजी होईल. सदर दोन्हीही दिवशी सर्व १९ उमेदवार व त्यांचे खर्च प्रतिनिधी यांना निवडणूक कार्यालयात उपस्थित राहणेबाबत सूचना दिलेल्या आहेत.