उद्धव ठाकरेंना न्यायालयाचा मोठा धक्का!

मुंबई – उद्धव ठाकरेंच्या शिवसेनला मोठा धक्का बसला आहे. कारण रवींद्र वायकर यांच्या खासदारकीला आव्हान देणाऱ्या शिवसेना गटाचे (ठाकरे गट) नेते अमोल कीर्तीकर यांची निवडणूक याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदरासंघातील शिवसेनेचे (शिंदे गट) नेते रवींद्र वायकर यांची खासदारकी कायम राहणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना दिलासा मिळाला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत फेरफार करून वायकर यांना विजयी घोषित करण्यात आल्याचा कीर्तिकर यांचा आरोप आहे. वायकर यांच्या विजयाला कीर्तीकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. अमोल कीर्तीकर यांनी याचिकेची मांडणी योग्यरित्या करण्यात आलेली नाही. तसेच टेंडर मते ही विजयी उमेदवाराला कशी मिळाली हे दाखविण्यास कीर्तीकर अपयशी ठरले, त्यामुळे, त्यांची याचिका फेटाळून लावावी असा दावा रविंद्र वायकर यांच्यावतीने करण्यात करण्यात आला होता. हा दावा न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकलपीठाने योग्य ठरवत किर्तीकर यांची याचिका फेटाळली आहे. दरम्यान कीर्तिकर यांनी त्यांच्या पराभवात आणि वायकर यांच्या विजयात गोंधळ झाल्याचा आरोप करत ही याचिका दाखल करून वायकर यांची निवड रद्द करावी आणि अमोल कीर्तिकर यांना विजयी घोषित करावे, अशी मागणी याचिकेत केली होती. आता अमोल कीर्तिकर हे सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. कोर्टाचा हा निर्णय उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय. कोर्टाच्या निर्णयामुळे डेंजर झोनमध्ये असलेल्या शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांची खासदारकी कायम राहणार आहे.

मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणी अमोल किर्तीकर ईव्हीएम मतमोजणीत एका मताने आघाडीवर होते. मात्र, पोस्टल मतमोजणीत वायकर यांचा ४८ मतांनी विजय झाला. वायकर यांना ४,५२,६४४ मते आणि किर्तीकर यांना ४,५२,५९६ मते मिळाली.