जुन्या भांडणातून दोन जणांवर तलवारीने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी १३ जणांवर गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे. हा प्रकार बुधवारी दि.१० जुलै रोजी रात्री बाराच्या सुमारास हांडेवडी रोड वरील जैन टाऊन शीपच्या बाजूला घडला आहे.आरमान इस्लाम शेख व नदीम मोहम्मद हुसेन शख असे जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबत पोलीस शिपाई बालाजी वाघमारे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमीन अशिफ खान, आयान आजीम शेख, आबुरजर युसुफ शेख यांना अटक केली आहे. तर आरकान तसबीर शेख, अमन तसबीर शेख, रेहान रियाज खान, सादीक उर्फ बुरुन शेख, आफताब शेख, दानिश इब्राहिम शेख, फराज वजीर शेख, कैफ सलिम शेख, शाहरुख सलिम शेख , आरबाज शेख यांच्यावर भान्यासं १०९, ११८ (२), १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, १९१(३) १९०आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा, क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.
फिर्य़ादी बालाजी वाघमारे व पोलीस शिपाई शिवानंद लुंगसे हे रात्रपाळी करता महंमदवाडी मार्शल कर्तव्य करत होते. त्यावेळी त्यांना हांडेवाडी रोडवरील जैन टाऊनशीपच्या बाजूला काही मुले आपापसात भांडण करुन गोंधळ घालत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार फिर्य़ादी व त्यांचे सहकारी त्या ठिकाणी गेले असता आरोपी आरकान शेख याच्या हातात तलवार घेऊन पळून जाताना दिसला. आरोपींनी आरमान शेख आणि नदीम शेख यांच्यावर वार करुन गंभीर जखमी केल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात अरमान याच्या हाताचा कोपरा, पंजा व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर नदीम याच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन तिघांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.