
राजस्थानमधील केकडी येथे एक अत्यंत धक्कादायक घटना घडलीये. चुलत बहिणीनेच आपल्या बहिणी हत्या केली. समज देऊनही बहिण ऐकत नसल्याने अखेर दुसऱ्या बहिणीने आपल्या रस्त्यातील काटा काढत चुलत बहिणीची हत्या केली. घडलेली संपूर्ण घटना ऐकल्यानंतर पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली.

हे सर्व प्रकरण प्रेम प्रकरणातून घडल्याचे उघडकीस आले. दोन्ही चुलत बहिणी एकाच मुलाच्या प्रेमात पडल्या. आरोपी तरुणी मृत बहिणीला सतत आपल्या बॉयफ्रेंडपासून दूर राहण्यास सांगत होती. मात्र, काहीही करून बहिणी आपल्या बॉयफ्रेंडपासून दूर राहत नसल्याचे आरोपी बहिणीच्या लक्षात आले. आरोपी बहिणीने पोलिसांना सांगितले की, मी तिला शंभर वेळा सांगितले होते की, माझ्या बॉयफ्रेंडपासून दूर राहा. पण तिला समजतच नव्हते. मी नसताना ती सतत माझ्या बॉयफ्रेंडसोबत फोनवर बोलत होती. हेच नाही तर त्याच्याशी जवळीकता वाढवत होती. घरामध्येही ती यावरून मला बोलत होती. मला तिला मारायचे नव्हते, पण मी तिला काय सांगत होते ते तिला कळतच नव्हते.

१५ ऑगस्टला आम्ही दोघी नेहमीप्रमाणे म्हशी चारण्यासाठी शेतात गेलो होतो. यावेळी आमच्या दोघींमध्ये बॉयफ्रेंडवरून वाद झाला. ती माझे अजिबातच ऐकत नव्हती. यावेळी माझा राग इतका जास्त अनावर झाला की, मी काठीने तिला मागून जोरात मारले आणि लगेचच ती जमिनीवर पडली. नेमके काय घडले, याची संपूर्ण माहिती ही आरोपी बहिणीने दिलीये. या प्रकारानंतर यांच्या घरच्यांचा पायाखालची जमिन सरकली आहे. हेच नाही तर पोलिसांनी अवघ्या तीन तासांमध्ये गुन्हा कबुल करून घेतलाय. मात्र, प्रेमासाठी दोन्ही बहिणी कोणत्या टोकाला गेल्या याची आता जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. या खळबळजनक घटनेनंतर संपूर्ण गावामध्ये एक चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे.









