लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांसह कार्यकर्ते , पदाधिकारी यांच्यात मोठा आत्मविश्वास वाढला आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरु झालेली आहे. उमेदवारीबाबत पक्षात रस्सीखेच सुरु आहे. त्यातच आता पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघावर शहर नेतृत्वाची प्रतिष्ठा पणाला लागण्याची शक्यता आहे.
हडपसर विधानसभा मतदारसंघात दोन्ही इच्छुक उमेदवार हे राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) चे शहर अध्यक्ष आहेत. म्हणून यंदा हडपसरमध्ये मोठी चुरस रंगणार आहे. परंतु महायुतीत आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षामुळे उमेदवारीसाठी रस्सीखेच होऊ शकते.राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून प्रशांत जगताप आणि शिंदेंचा शिवसैनिक शहर प्रमुख प्रमोद भानगिरे उर्फ नाना भानगिरे इच्छुक आहेत. तसेच, त्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीच विधानसभेची तयारी सुरू केली आहे. परंतु, घटक पक्षांमध्ये उमेदवारी कोणाला द्यायची ही महाविकास आघाडी आणि महायुती समोर मोठी अडचण असणार आहे.
ज्यावेळी अजित पवार यांनी काही नेत्यांना सोबत घेऊन महायुतीत सहभागी होत आपली वेगळी चूल मांडली तेव्हा प्रशांत जगताप यांनी शरद पवारांना महत्वाच्या वेळी साथ दिलेली आहे.अजित पवार पक्षाचे विद्यमान आमदार चेतन तुपे आणि भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार योगेश टिळेकर यांची निवडणूक लढवण्याची पुन्हा इच्छा आहे.तर महादेव बाबरही मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत.त्यामुळे मतदारसंघात उमेदवारी कोणाला मिळेल आत्ताच काही सांगता येत नाही.मात्र सर्वपक्षीय उमेदवारांनी आपली विधानसभेची तयारी सुरु केल्याचे चित्र दिसत आहे.