
अजित पवार यांची घोषणा, आवडो किंवा न आवडो पण महापालिका होणार म्हणत कोणाला इशारा?

पुणे – उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सकाळी चाकण औद्योगिक क्षेत्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी चाकण औद्योगिक क्षेत्रातील नागरी समस्यांची पाहणी केली. यावेळी अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे नवीन समीकरणे तयार होणार आहेत.

पुणे-नाशिक आणि चाकण-शिक्रापूर मार्गावरील या चौकात वाहतूक कोंडी नित्याची असती. याच चौकातून चाकण एमआयडीसीत कर्मचाऱ्यांना जावे लागते. या एमआयडीसीत १५०० छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत, त्यात साडे तीन लाख कर्मचारी काम करतात. त्यामुळे या परिसरात रोज लाखभर वाहने ये-जा करतात. त्यामुळे या चौकातील कोंडी फोडण्याचे मोठे आव्हान सरकार समोर असणार आहे. या वेळी चाकणला स्वतंत्र महापालिका होणार असल्याचे सूतोवाचही अजित पवार यांनी केले. मांजरी, फुरसुंगी, उरळी देवाची या भागात एक महापालिका आणि चाकण आणि हिंजवडी भागात ही महापालिका करावी लागणार आहे, असेही अजित पवार म्हणाले आहेत. तसेच कोणाला आवडेल किंवा नाही, तरीही मी करणार असल्याचा इशारा अजित पवारांनी या तीन महापालिका करण्यावर दिला आहे. चाकण चौकात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी काही वाहनांना अडवून ठेवलं होतं, यावर अजित पवार चिडले. त्यांनी पोलीस आयुक्त विनायकुमार चौबे यांना थेट सुनावत म्हटलं, “ओ चौबे, हे काही योग्य नाही! अशा पद्धतीने वाहनं अडवून वाहतूक कोंडी का केली? ही सगळी वाहतूक तात्काळ सुरु करा, असे आदेश पवार यांनी दिले.
अजित पवार यांनी आज पहाटेच्या वेळेस या भागातील वाहतुकीची पाहणी केली. यावेळी पोलिसांवर काहीसे संतापल्याचे दिसून आले. मी सकाळी ६ वाजता दौरा करतोय एक गाडी थांबली की लगेच वाहनांच्या रांगा लागताहेत. आताच अशी परिस्थिती असेल तर पिक टाइममध्ये काय अवस्था होत असेल अशी चिंता अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.









