
दुचाकीवरुन आलेल्या ९ ते १० जणांच्या टोळक्याने बालेवाडी येथील एका गॅरेजवर दरोडा टाकला. गॅरेजमधील लोकांना हत्याराने धमकावून त्यांना मारहाण करुन लुबाडले. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी तिघांना अटक केली असून ५ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

ही घटना बालेवाडी येथील विलास तात्या बालवडकर चौकातील रविराज ऑटोमोबाईल्स अँड वॉशिंग सेंटर येथे शुक्रवारी सायंकाळी साडेपाच ते पावणे सहा वाजण्याच्या दरम्यान घडली.फिर्यादीकडून मिळालेले वर्णन आणि तपास पथकाला मिळालेल्या माहितीवरुन आरोपी पिंपळे गुरव, सांगवी येथे असल्याच्या माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील , पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, विजयानंद पाटील, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रणील चौगुले, हवालदार वाघवले, मोमीन, दुशिंग, तांदळे, दांगडे, माने, शिर्के, दुर्गे, पोलीस अंमलदार खरात, भांगले, तरंगे यांनी केली आहे









