
नितेश राणेंमुळे मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी, फडणवीसांकडून राणेंना समज, ते वाक्य खटकले?

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह मंत्रीमंडळातील वरिष्ठ सदस्य या बैठकीस उपस्थित होते.

आजची महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची मुंबईतील बैठक वेगळ्या करणासाठीही चर्चेत आली आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘कोण कोणाचा बाप’ यावर जोरदार चर्चा रंगल्याची माहिती पुढे आली आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्री नितेश राणे यांची तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे खरीप हंगाम तोंडावर आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची खरीप पेरणीची लगबग सुरू झालेली आहे. त्यातच बोगस बियाणे, बनावट खतांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. तर पूर्व मौसमी पावसाने शेतकऱ्यांचं ५० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र बाधित झालेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदतीची अपेक्षा असतानाही राज्य सरकारने मात्र पंचनाम्याचे आदेश देऊन बोळवण केली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत खालील प्रमुख निर्णय घेण्यात आले:
अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा : सामाजिक न्याय विभागाच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली असून आगामी विधिमंडळ अधिवेशनात यासाठी विधेयक सादर केले जाणार आहे.
विद्यावेतनात वाढ : शासकीय भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात 6,250 रुपये इतकी वाढ.
पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात 10,000 रुपयांची वाढ.
बी.एस्सी. नर्सिंग विद्यार्थ्यांनाही 8,000 रुपयांचे विद्यावेतन मिळणार. (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग)
राज्य उत्पादन शुल्कात सुधारणा : महसूल वाढीसाठी विविध दरांमध्ये सुधारणा करण्यात आली असून राज्य उत्पादन शुल्क विभागाने हे उपाययोजनांचे पाऊल उचलले आहे.









