बिग बॉसमध्ये तब्बल ८०० साड्या घेऊन आली ही तरुणी

कुंभमेळ्यातील या विधानामुळे आली होती चर्चेत, एवढ्या कोटीची आहे मालकीण, शाही राहणारी कोण आहे ती?

मुंबई – लर्सवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 19’ सुरू होताच घरातील एका तरुणीने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पहिल्या काही दिवसांतच ती काही सदस्यांशी वाद घालताना दिसली आणि त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसेच ती तिच्या शाही जीवनशैली मुले चर्चेत आली आहे.

तान्या मित्तल असे त्या अभिनेत्रीचे नाव आहे. बिग बॉसच्या घरात दाखल झाल्यानंतर तान्या मित्तलचे व्यक्तिमत्त्व, तिचा व्यवसाय आणि तिची श्रीमंती हे चर्चेचे केंद्रबिंदू ठरत आहेत. तान्या मित्तल ही सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि उद्योजिका असून, तिच्या इंस्टाग्रामवर तब्बल २५ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) येथील रहिवासी असलेल्या तान्याने अगदी कमी वेळात लोकप्रियतेच्या शिखरावर मजल मारली आहे. तसेच ती अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध होताना दिसत आहे ते म्हणजे तिच्या साड्या. घरातली ती रोज वेगवेगळ्या स्टाईलच्या साड्या नेसताना दिसते. एवढंच नाही तर ती भरपूर संख्येमध्ये साड्या घेऊन शोमध्ये आली आहे. तान्याने ‘बिग बॉस’च्या घरात ८०० हून अधिक साड्या आणल्या आहेत. सोशल मीडियावर तान्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. सोशल मीडिया वापरकर्ते त्या व्हिडिओंवर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. शोच्या पहिल्या दिवशी तान्या म्हणाली होती की , ‘ माझ्या अंगरक्षकांनी कुंभमेळ्यात १०० लोकांना वाचवले, पोलिसांनाही. मी याच कारणासाठी इथे आले आहे.’ पण त्यावरूनही तिला आता ट्रोल केलं जात आहे. रिपोर्टनुसार, तान्या हिच्याकडे तब्बल २ कोटी रुपयांची संपत्ती आहे. वयाच्या १९ व्या वर्षी तान्या २ कोटींची मालकीण आहे.तिचा ‘हँडमेड विथ लव्ह बाय तान्या’ नावाचा एक ब्रँड आहे, ज्याद्वारे ती हँडबॅग आणि साडीचा व्यवसाय करते.

https://www.instagram.com/reel/DBk7MG6PsUN/?igsh=MXJzdmh3czdpNHZh

शोमध्ये तिची ओळख आध्यात्मिक इन्फ्लुएन्सर म्हणून करून देण्यात आली आहे. पण शोमध्ये प्रवेश करताच तान्या ट्रोल होऊ लागली आहे. तान्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.