
अभिनेत्रीची सडेतोड प्रतिक्रिया म्हणाली मी आतापर्यंत गप्प होते, पण कमजोर…

मुंबई – अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट हे हिंदी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय कपल आहे. पण गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत.


गेल्या काही दिवसांपासून नील आणि ऐश्वर्याचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा आहे. त्यावर अखेर ऐश्वर्या शर्माने मौन सोडलं आहे. सोशल मीडियावर तिने याबद्दल संताप व्यक्त केला आहे. ऐश्वर्या म्हणाली की,”मी आतापर्यंत बराच काळ शांत होते. यासाठी नाही की मी कमजोर आहे पण मला शांतता हवी आहे. पण काही लोक माझ्याबद्दल खोट्या अफवा पसरवत आहेत ज्याबद्दल मी काहीच बोलले नाही. त्याच्याशी माझा काहीच संबंध नाही. हे खूप त्रासदायक आहे. मी हे सुद्धा स्पष्ट करते. मी कोणतीही मुलाखत किंवा कोणत्याही ठिकाणी वक्तव्य केलेलं नाही. माझं आयुष्य हे तुमच्या मनोरंजनाचा भाग नाहीये. मी शांत आहे म्हणजेच कोणीही वाटेल ते बोलावं याची परवानगी मी कोणाला दिलेली नाही. कृपया माझ्या नावाचा चुकीचा वापर करणं बंद करा. जर तुमच्याकडे याचे कोणतेही पुरावे किंवा काही ऑडिओ किंवा व्हिडिओ असेल तर तो दाखवा. तसंच या सगळ्या अफवा पसवरणं बंद करा. असे म्हणत अफवेला विराम दिला आहे.

नील आणि ऐश्वर्याने २०२१ मध्ये लग्न केलं. ही जोडी बिग बॉस १७ मध्ये सहभागी झाली होती. .त्यावेळी ही जोडी त्यांच्यातील वादामुळेही चर्चेत राहिली होती. या दोघांची पहिली भेट ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेच्या सेटवरच झाली होती.










